अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- दूध दरवाढीबाबत वारंवार मागणी करूनही राज्यातील आघाडी सरकारला जाग येत नाही. त्यामुळे रस्त्यावर उतरण्याची वेळ आली.
दुधाच्या भाववाढीबरोबरच १० रुपये प्रतिलिटर अनुदान द्या; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी शनिवारी दिला.
सकाळी ११ वाजता नगर-मनमाड मार्गावरील बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर भाजप व रासपच्या वतीने दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले.
कर्डिले म्हणाले, लाॅकडाऊनचा काळात शेती व शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली. दुधाला १७ ते १८ रुपये प्रतिलिटर भाव मिळत असल्याने दुभत्या जनावरांचा सांभाळ करणे शेतकऱ्यांना अवघड झाले. राज्यातील आघाडी सरकार झोपलेले असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत.
रासपचे जिल्हाध्यक्ष शरद बाचकर म्हणाले, खर्चाच्या तुलनेत दुधाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. नायब तहसीलदार गणेश तळेकर व पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com