अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- सांताक्रूझ येथे आज काळीज पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे.मोबाईल चोरीच्या आरोपावरून एका तरुणाला बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे.
सांताक्रूझ येथील पालिकेचा अड्डा चोरांचे केंद्र बनत चालला आहे.येथे झालेल्या मारहाणीत सैजाद खान(३०) याचा मृत्यू झाला आहे.
पालिकेच्या मैदानावर सैजाद याला मुकादम आणि कामगारांनी लोखंडी खांबाला बांधल आणि त्यानंतर काठी आणि लाथा बुक्यांनी त्याला जबर मारहाण केली.
मारहाण करून जखमी झालेला सैजाद विव्हळत जवळील रिक्षात जाऊन झोपला. त्यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्याला भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.
सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यानंतर पोलीस तपासात आरोपीना अटक पण करण्यात आल.मुक्तानंद पार्कमध्ये हि घटना घडली.
मृत तरुणाला लाथा बुक्यांनी आणि काठ्यांनी मारहाण करण्यात आली.त्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून सहा जणांना अटक न करण्यात आली आहे .
मोबाईल चोरीमुळे मारहाण करण्यात आल्याचे कळवण्यात आले आहे. २५ डिसेंबर रोजी हि धक्कादायक घटना घडली.साईजड याच्या भावाच्या तक्रारीवरून सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.