महाराष्ट्रातील दीड हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन मंदिरांचा होणार जीर्णोद्धार ! पहा कोणते आहेत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य शासनाने इतिहासकालीन तसेच पुरातन मंदिरांचे जतन-संवर्धनाच्या दृष्टीने पाचशे ते एक हजार किंवा त्याहून अधिक दीड हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी निविदा प्रक्रिया मागविण्यात आल्या होत्या.

राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पहिल्या टण्यात आठ मंदिरांच्या जीर्णोद्धारापैकी तीन मंदिरांच्या कामाला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एएसआय) तत्त्वतः मंजुरी प्राप्त झाली आहे.

त्यानुसार बीड जिल्ह्यातील भगवान पुरुषोत्तम (पुरुषोत्तमपुरी), रत्नागिरी जिल्ह्यातील धूतपापेश्वर (राजापूर) आणि छत्रपती संभाजीनगर येथील खंडोबा या प्राचीन मंदिरांच्या परिसरात उत्खननास सुरुवात करण्यात आली आहे. राज्य शासनाने इतिहासकालीन तसेच पुरातन मंदिरांचे जतन-संवर्धनाच्या दृष्टीने पाचशे ते एक हजार किंवा त्याहून अधिक दीड हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी निविदा प्रक्रिया मागविण्यात आल्या होत्या. देशातील विविध कंपन्यांनी सहभाग नोंदवला असताना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) देखील निविदा प्रसिद्ध केली होती.

एमएसआरडीसीला हे काम देत त्यांच्या अखत्यारित समिती स्थापन करण्यात आली असून, पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही समिती काम करत आहे. समितीने राज्यातील विविध ठिकाणच्या जीर्ण होत असलेल्या इतिहासकालीन मंदिरांची माहिती पुरातत्व विभागाकडून मागवली होती.

त्यानुसार आठ मंदिरांचे संवर्धन करणे महत्त्वाचे असल्याची माहिती प्राप्त होत एमएसआरडीसीने दोन टप्यांत काम करण्याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला. पुरातन मंदिर संवर्धन करताना पारंपरिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आलेल्या मूळ वास्तूला कुठलाही धक्का न लावता है काम करण्यात येणार आहे.

त्यासाठी मुळाचा लेप आणि चुनखडी याचा वापर करण्यात येणार आहे. भविष्यात दीर्घकाल मंदिराचे जतन, संवर्धन होत मंदिर उजवळले जाणार आहे. त्यामध्ये धूतपापेश्वर मंदिरासाठी १० कोटी, खंडोबा मंदिरासाठी ७ कोटी तर पुरुषोत्तमपुरी मंदिरासाठी ६ कोटी असा २३ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे.

एमएसआरडीसीने मंदिर परिसरातील काम करण्यापूर्वी आवश्यक त्या विभागांच्या परवानग्या घेतल्या असून, प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. पुरातन मंदिरांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाच्या निदेशानानुसार पहिल्या टप्प्यात आठ मंदिरांची कामे करण्यात येणार आहे. बीड, रत्नागिरी आणि छत्रपती सभाजीनगर येथील मंदिराच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. उर्वरित मंदिराच्या कामाबाबत आराखडा तयार करून या मंदिराचादेखील कायापालट करण्यात येणार आहे.

या मंदिरांचा होणार कायापालट
जिल्हा                                                                     मंदिर

पुणे (कार्ला)                                                       एकवीरादेवी
सातारा                                                                  उत्तरेश्वर
कोल्हापूर (खिद्रापूर)                                              कोपेश्वर
छत्रपती संभाजीनगर                                              खंडोबा
बीड (माजलगाव)                                               पुरुषोत्तमपुरी
नाशिक (सिन्नर)                                                     गोंदेश्वर
अमरावती (लासूर)                                               आनंदेश्वर
रत्नागिरी (राजापूर)                                                धूतपापेश्वर
गडचिरोली (चार्मोशी)                                      मार्कंडेय शिवमंदिर