अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ‘महापालिकेत सत्ताधाऱ्यांचे काहीच चालत नाही,’ अशी टीका माजी आमदार अनिल राठोड यांनी रविवारी भाजपचे नाव न घेता केली.
‘महापालिकेत अधिकाऱ्यांकडून महिलांना होत असलेल्या त्रासाबाबत कोणीही दखल घेत नाही व हे दुर्दैवी आहे,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
मनपातील महिलांनी एका अधिकाऱ्याच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
दोन महिन्यांपूर्वी दिलेल्या निनावी तक्रार अर्जाबाबत चौकशीची मागणी शहर शिवसेनेने केली आहे.
‘संबंधित प्रकरणाची मनपा आयुक्तांनी चौकशी करून १५ दिवसांच्या आत आवश्यक कारवाई झाली नाही
तर शिवसेना स्टाईलने त्याला उत्तर दिले जाईल,’ असा इशारा राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com