चार भिंतींमध्ये नाही तर चक्क डोंगरावर भरते शाळा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-  प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षणाच्या ज्ञान गंगेला अत्यंत महत्व आहे. तंत्रज्ञांनाच्या युगात सर्वत्र शाळा देखील मॉडर्न झाल्या आहे. मात्र जिल्ह्यात आजही अशी काही गावे आहे जिथे शिक्षणासाठी आजही संघर्ष करावा लागतो आहे.

कोरोनामुळे शाळा बंद आहे, यावर उपाय म्हणून सरकारने ऑनलाईन क्लासेस घेण्यास सांगितले. मात्र आजही असे भरपूर विद्यार्थी आहे कि ज्यांच्याकडे मोबाईल, इंटरनेट, नाही. पोराच्या शिक्षणात अडचण येऊ नये म्हणून पालकांनी कर्ज तसेच उसने पैसे घेऊन मुलांसाठी मोबाईल हि घेऊन दिले.

मात्र गावात इंटरनेटसाठी रेंजच नसल्याने शिक्षणाचा खोळंबा होत आहे. हा प्रकार घडतो आहे जिल्यातील अतिदुर्गम अशा अकोले तालुक्यातील अदिवासी भागात. हातावरची पोटे असलेल्या या तालुक्यात शेतकरी कबाड कष्ठ करून दोन वेळेचे जेवण मिळवतो.

त्यातच या ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांना मोठा आर्थिक भर सहन करावा लागतो आहे. मात्र हे सर्व केले असूनही मोबाईलला रेंजच मिळत नसल्याने येथील मुले रोज भाकरी बांधून वाकड डोंगरावर पाच किलोमीटर पायी जाऊन दगडाचे मचाण करून जिथे रेंज आहे त्या ठिकाणी बसतात.

आपल्या शिक्षकांशी सवांद साधून अभ्यासाचे धडे गिरवतात. मात्र नेटवर्किंग व्यवस्थित होत नसल्याने चार तासात केवळ अर्धा ते पाऊणतास त्याचा अभ्यास होतो. ऊन, वारा, पाऊस या सर्वांचा सामना करत येथील विद्यार्थी शिक्षण घेतात. तसेच काही मुले वडिलांना मदत व्हावी म्हणून गुरे, शेळ्या घेऊन जातात. गुरे शेळ्या एका डोंगरावर व मुले दुसऱ्या डोंगरावर.

ऑनलाईन शिक्षण घेत असताना येणाऱ्या अडचणींबाबत विद्यार्थी म्हणतो…. ऑनलाईनमुळे वडिलांनी १२ हजाराचा मोबाईल घेऊन दिला. गावात रेंज नसल्याने वाकड डोंगरावर येतो. मात्र रेंज पाऊस व धुके असल्याने धरसोड करते दिवसभरात एक तासच अभ्यास होतो.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24