अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- जून ते ऑक्टोबर २०२० या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीच्या पूराने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल विभागाला देऊन पंचनामे करून घेतले.
झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वीच नुकसानभरपाईच्या पहिल्या हफ्त्याची ३ कोटी १ लाख रुपयांची रक्कम मागीलवर्षी शेतकऱ्यांना मिळालेली आहे.
आता दुसऱ्या टप्प्यातील ४ कोटी ६४ लाख ५८ हजार रुपयांची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांची काढणी करून मोकळया जागेवर सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांचे ज्या ठिकाणी ढिगारे लावले होते, त्या पिकांना जागेवरच मोड आल्याचे आ. काळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्वत: पाहीले होती.
या नुकसान भरपाईसाठी आ. काळे यांनी पुनर्वसन व महसूल विभागाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून दुसऱ्या टप्प्याची ४ कोटी ६४ लाख ५८ हजार रुपयांची रक्कमही महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून नैसर्गिक संकटाच्या वेळी शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहे.