चोऱ्यांचे सत्र थांबेना; घराबाहेर पडणे होतेय मुश्किल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे दिवाळीचा सण आला आहे तर दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. नुकतीच दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे गंठण ओरबाडून चोरट्याने धूम ठोकली.

या घटनेमुळे आता बाहेर फिरणे देखील जोखमीचे झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील पाईपलाईन रोडवरील प्रशांतनगरमध्ये रात्री साडेआठच्या सुमारास हि घटना घडली आहे.

याबाबत छाया किशोर काळे (रा. अयोध्या काॅलनी, पाईपलाईनरोड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून हळूहळू चालल्या होत्या.

त्यावेळी पाठीमागून आलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे गंठण ओरबाडून धूम ठोकली. फिर्यादी यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली.

घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सुरसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास निरीक्षक सुरसे करीत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24