अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुटखा, पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीचा सुळसुळाट सुरु आहे. याच अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून या अवैध वुवसाय करणाऱयांविरोधात दंडात्मक कारवाईचे पॉल उचलले आहे.
याचाच धसका घेत आता गुटख्याचा काळाबाजार सुरु झाला आहे. श्रीरामपूर पोलिसांनी जिल्ह्यातील गुटखा तस्करीवरील पडदा उठविल्यानंतर ठिकठिकाणी स्थानिक गुटखा तस्करांविरोधात कारवाईचा धडाका सुरु झाला आहे.
एकीकडे जिल्हाभर कारवाई सुरु असतांना संगमनेरात गुटख्याचा काळाबाजार सुरु झाला आहे. गेल्या आठवड्यात श्रीरामपूर पोलिसांनी एकलहरे येथील
एका गुटखा तस्कराच्या गोदामावर छापा घालून बहुधा जिल्ह्यात आजवरचा सगळ्यात मोठा गुटख्याचा साठा जप्त केला होता.
पोलिसांच्या धडक कारवाईमुळे संगमनेरातील गुटखा तस्कर भितीने भूमिगत झाले असून या क्षेत्रात उगवलेल्या काही नव्या तस्करांनी अधिक पैशांच्या लालसेने गुटख्याच्या किंमती आभाळाला टेकवल्या आहेत.
त्यामुळे संगमनेर तालुक्यात येणारा गुटखा जवळपास बंद झाला असून तालुक्यातील पान टपर्यांवर गुटख्याची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम सात रुपये मूळ किंमत असलेला आणि बारा रुपयांना विकला जाणारा गुटखा
आज 18 ते 20 रुपये तर अवघ्या चार रुपयांना मिळणारा हिरा गुटखा 10 ते 12 रुपयांना मिळत आहे. शहरातील मोठे गुटखा तस्कर भूमिगत झाल्यानंतर निर्माण झालेल्या गुटखा पोकळीत काही नवे बहाद्दर उतरले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved