राज्य सरकारने दुधाला हमीभाव द्यावा ! दुष्काळाने होरपळत असलेला शेतकरी संकटात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. सत्तेसाठी महाराष्ट्रातील जनता वेठीस धरली जात आहे. राज्यातील दूधउत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव नाही, शेतीमालाला हमीभाव नाही.

अन्न, वस्त्र, निवारा प्रमुख गरजा आहेत; पण याकडे राज्य सरकारचे लक्ष नाही, शासनाने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी दूधउत्पादक संजय कावळे यांनी केली आहे.

राज्यातील शिक्षण व आरोग्य विभागातील हजारो पदे रिक्त आहेत. तर तरुणांच्या हाताला काम नाही. बेरोजगार तुरुण उपाशी आहे. तर शेतकरी वर्गाचा अधार असलेले दूध आज कवडीमोल दराने घेतले जात आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत आज मितीस सात ते आठ रुयांनी दुधाचे दर कमी झाले आहेत. दुधाला शासनाने ३५ रपये हमीभाव जाहीर केला असताना दूध कंपन्या शेतकरी वर्गाचे शोषन करीत आहेत.

तर बाहेरील राज्यातील दूधउत्पादक कंपन्या मात्र शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव देत आहेत. हा दुजाभाव शासनाचे नियंत्रण नसल्याने चालू आहे. दूध दर कमी केले; पण पुशखाद्याचे दर मात्र वाढतच आहेत.

दुष्काळाने होरपळत असलेला शेतकरी संकटात आहे, अशा परिस्थितीत राज्य शासानाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी संजय कावळे यांनी केली आहे.