वादळ वारा संपला आता चढणार उष्णतेचा पारा, ४ अंशांपर्यंत तापमान वाढणार..पहा हवामानचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मार्च महिना लागला की सूर्य आग ओकू लागतो. उष्णता वाढू लागते. मे महिन्यात साधारण पावसाचे नक्षत्र लागेपर्यंत उष्णता वाढलेली पाहायला मिळते. यावेळी मात्र अवकाळी पावसाने जास्तच मनावर घेतलेले पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी वादळी वारे झाले.

त्यामुळे थोडी उष्णतेची काहीली कमी जाणवली. विदर्भ, मराठवाडा व महाराष्ट्रातील बराचसा भाग वादळी वाऱ्याने व्यापला होता. आता या वादळी पावसाचे सावट संपले असून उन्हाळा आता आपल्या रंगात येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उष्णतेचा पारा वाढणार असून नागरिकांना दिवसा उन्हाचे चटके, उष्णता व रात्री उकाड्याचा सामना करावा लागू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

एप्रिल महिन्याचा विचार केला तर साधारण १५ ते २० दिवस आकाशात ढग सोबतच अवकाळी पाऊस होता. त्यामुळे उष्णतेची तीव्रता कमी जाणवली असली तरी दमट उकाड्याचा अनुभव नागरिकांनी अनुभवला. 30 एप्रिल नंतर महाराष्ट्रात वीज, वारा, गारा व वादळी पावसासारख्या वातावरणापासून सुटका मिळेल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

विदर्भातील १० जिल्हे ४० अंशांच्या पुढे
सोमवारी विदर्भाचा पारा वर उसळला. गोंदिया वगळता १० जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंशांच्या वर पोहचले. अकोला येथे ४२.३ अंश तापमान नोंदविण्यात आले. त्यामुळे दिवसभर असह्य चटके सोसावे लागत आहेत.

प. महाराष्ट्रात, कोकणात तापमान २ ते ४ अंशांनी वाढण्याची शक्यता
मध्य भारत, विदर्भ, मराठवाडा, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत दिवसाचे कमाल तापमान २ ते ४ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उष्णता जास्त दिसेल. दक्षिण मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा परिणाम अधिक जाणवेल. उष्ण लाटेचा इशारा कोकणातही आहे.

मराठवाड्यालाही चटके, लातूर, धाराशिव तापले
छत्रपती संभाजीनगरात सोमवारी ४१.४ अंश सेल्सिअसवर पारा गेला. येणाऱ्या काळात तापमान वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ वर्तवित आहेत. आठ ते दहा दिवस ड्राय हिटची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील औराद शहाजानी परिसरात शुक्रवारपासून तापमान ४२ अंशांवर पोहोचले होते.

सोमवारी ४३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. लातूर, धाराशिव व कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातही तापमान वाढलेले आहे