अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : ने निसर्ग चक्रीवादळाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांबही कोसळल्याने लाखोंचे नुकसान झाले. मात्र प्रशासनाने घेतलेल्या काळजीमुळे वादळाच्या तडाख्यापासून राहुरी शहर व तालुका बचावला आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर महसूल, पोलिस, महावितरण, आरोग्य विभागासह आपत्ती निवारणविभाग अत्याधुनिक सुविधांसह सज्ज होते. राहुरीत बुधवारी सायंकाळी सहानंतर वेगाने वारे वाहण्यास सुरुवात झाली.
या वादळाने काही ठिकाणी विजेचे खांब, रोहित्रेही कोसळली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक घरातच होते. प्रशासनानेही जनतेला सावध केले होते. वीजपुरवठा खंडीत असल्याने हानी टळली.
गरूवारी महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम हाती घेऊन वीजपुरवठा सुरळीत करत होते. मुळा धरणावरही वादळाचा जोर अधिक असल्याने येथेही वीजपुरवठा खंडीत केला होता.
शहराचा पाणीपुरवठा खंडीत झाल्याने शहरवासियांना निर्जळीचा सामना करावा लागला. तसेच धरणक्षेत्रातील मत्स्य प्रकल्पांनाही तडाखा बसल्याने लाखोंचे नुकसान झाले . मात्र प्रशासनाने घेतलेल्या काळजीमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews