कांदा पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला; कमी खर्चात मिळणार भरघोस उत्पादन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. दरम्यान परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

यातच अतिवृष्टीमुळे कांदारोपांचे मोठे नुकसान झाले. कांदारोपांची नासाडी झाल्याने, पुन्हा रोपे टाकून लागवडीऐवजी थेट कांदा पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

त्यामुळे यंदा प्रथमच कांदापेरणी वाढल्याने तालुक्‍यातील कांद्याचे क्षेत्र वाढणार आहे. दरम्यान सुरुवातीला महागड्या दराने घेतलेले कांदाबियाणे सततच्या पावसामुळे खराब झालं.

शेतात साचलेले पाणी, ढगाळ हवामानामुळे कांदारोपे खराब झाली. आता कमी खर्चात कांदापेरणीसाठी यंत्राची मागणी वाढली आहे. कांदालागवड करण्याऐवजी थेट बियाणे पेरणीचा कल वाढला आहे.

आतापर्यंत तालुक्‍यात 225 हेक्‍टरवर कांदापेरणी झाली. त्यात आणखी कांदालागवडीचे क्षेत्र वाढणार असल्याची शक्‍यता कृषिविभागाने वर्तविली आहे. पेरणीमुळे खर्चासह वेळ, मशागत कमी लागणार आहे.

त्यामुळे कांदापेरणी फायद्याची ठरणार असल्याचे कांदाउत्पादकांनी सांगितले. कांदालागवडीच्या खर्चात बचत होऊन पेरणीमुळे वेळही वाचणार आहे.

थेट कांदा बियाणे पेरणी पध्दतीमध्ये कांदा लागवडीचा एकरी नऊ हजार रुपयांच्या खर्चाची बचत होते. तसेच कांदा उत्पादन कालावधी घटल्याने उत्पादन लवकर होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24