नव्या कोरोनाची दहशत; नवी नियमावली जारी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- कोरोना संसर्गाने रूप बदलल्याने जगभरात दहशत पसरली आहे. अशात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खबरदारी म्हणून मंगळवारी नवी नियमावली जाहीर केली. नव्या कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर नवी नियमावली जरी करण्यात आली आहे.

राज्य सरकारांनी ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली आहे याची खात्री करुन घ्यावी. प्रवासी कोरोनाग्रस्त आढळल्यास त्यांची लॅबमधून स्पाईक गेन बेस्ड आरटी-पीसीआर चाचणी करण्यात यावी.

प्रवासी कोरोनाबाधित आढळल्यास त्यांना संस्थात्मक विलगीकरणाची वेगळी व्यवस्था करण्यात यावी. त्यांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेत अथवा इतर संस्थामध्ये पाठवण्याची व्यवस्था करावी आणि त्याचे जिनोमिक सिक्वेसिंग करण्यात यावे.

संबधित प्रवाशांमध्ये संसर्गाचा फैलाव करणाऱ्या विषाणूंचा शोध लागला तर भारतात यापूर्वी असलेल्या मानक कार्यप्रणाली नुसार त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत. जर, अशा प्रकारचा संसर्ग नसेल तर घरगुती विलगिकरणात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रुग्णाच्या जिनोमिक सिक्वेसिंग मध्ये सार्स-कोव्हि-2 चा नवा स्ट्रेन सापडला तर संबंधित रुग्णाला विलगिकरणात ठेवण्यात येईल. त्यावर नियमानुसार उपचार करण्यात येतील. पॉझिटिव्ह आल्यानंतर १४ दिवसांनी पुन्हा एकदा आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येईल. त्यावेळी जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्यानंतर संबंधित रुग्णाचे २४ तासात घेण्यात आलेले दोन वेगवेगळे नमुने निगेटिव्ह येत नाहीत तोपर्यंत उपचार सुरुच राहतील.

ज्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे त्यांना घरगुती विलगिकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चेक-इनच्या आधी प्रवाशांना मानक कार्यप्रणालीची संपूर्ण माहिती देण्याची व्यवस्था संबंधित एअरलाईन्सनी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24