अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, वाढत्या चोऱ्या, दरोडे आदी घटनांमध्ये वाढ होत आहे. गुन्हेगारी वाढल्याने पोलिसांनी देखील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे.
नुकतीच पोलिसांनी श्रीगोंदा मध्ये लुटमारी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे दि.तीन दिवसांपूर्वी कांताबाई बबन घोडेकर यांच्या घरात घुसुन
कांताबाई यांना मारहाण करीत व चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोकड असा 32 हजारांचा मुद्देमाल लांबविण्यात आल्याची घटना घडली होती.
या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने तपास करीत लूटमार करणारे तीन सराईत आरोपी जेरबंद केले आहेत. या तिघांना पोलिसांनी केले जेरबंद किरण निरवशा भासेले (वय 50, रा.येळपणे, ता.श्रीगोंदा),
केशव किरण भोसले (वय 21, रा.येळपणे, ता.श्रीगोंदा), लखन किरण भोसले (वय 18) या तिघांना अटक केली आहे. ताब्यात घेतलेल्या तिघा आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत चोरलेला मुद्देमाल शंभू कुंज्या चव्हाण (रा.सुरेगाव, ता.श्रीगोंदा)
याच्याकडे असल्याचे सांगितले. दरम्यान पोलीस पथक चव्हाण याचा शोध घेत असून हा आरोपी फरार आहे. तिघाही आरोपींना पुढील कारवाईसाठी बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved