मुसळधार पावसाने वृक्ष केली जमीनदोस्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यासह गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये पावसाने सातत्याने हजेरी लावली असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

या पावसाने नगर शहरातील रस्त्यावरून जोरदार पाणी वाहिले. दरम्यान आज दुपारी झालेल्या पावसासोबतच काही जोराचा वारा देखील सुटला होता.

यामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या व झाडे उन्मळून पडली. पाऊस येतो तोच शहरातील अनेक भागांमध्ये वीजबत्ती गुल झाली होती.

दरम्यान आज दुपारी ढगांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली होती. नेहमी प्रमाणे शहरातील दिल्ली गेट,

चौपाटी कारंजा, चितळे रोड, लालटाकी रोड या ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचत असल्याने वाहनधारकांना या ठिकाणाहून गाड्या चालवताना मोठी कसरत करावी लागत होती.

काळ्या कुट्ट ढगांच्या गडगटासह सुमारे तासभर झालेल्या पावसाने शहरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरून पाणी वाहिले. हा पाऊस नगर तालुक्यातही जोरदार होता. त्यामुळे सीना नदीलाही पूर आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

अहमदनगर लाईव्ह 24