ट्रक उलटल्याने तब्बल सहा तास झाली वाहतूक ठप्प

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- नगर शहराबाहेरून जाणा-या बाह्यवळण रस्त्यावर निंबळक शिवारात या रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे खताच्या गोण्या वाहून नेणारा 16 टायरचा मालट्रक शुक्रवारी (दि.3) सकाळी रस्त्याच्या मध्यभागीच पलटी झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक तब्बल 6 तास ठप्प झाली होती.

हे पण वाचा :- आमदार निलेश लंके म्हणाले मंत्रिपदापेक्षा ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची !

दोन क्रेनच्या सहाय्याने हा अवजड मालट्रक रस्त्यावरून हटविल्यानंतर दुपारी वाहतूक सुरळीत झाली. बाह्यवळण रस्त्यावर नगर – कल्याण महामार्ग ते नगर-मनमाड महामार्गाला जोडणार्‍या निंबळक बायपास रस्त्यावर शुक्रवारी (दि.3) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मालट्रक उलटला.

हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक सरपंचाचे पद अखेर रद्द

या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. परंतु सुमारे सहा तासांपासून या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुण्याहून येणारी जड वाहतूक नगर-मनमाड महामार्गाला जाण्यासाठी केडगाव बायपास चौकापासून या निंबळक बायपास रस्त्यावरुन वळविलेली आहे.

हे पण वाचा :- राष्ट्रवादीचा हा नेता होणार अहमदनगरचा पालकमंत्री ?

या रस्त्यावर शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खताच्या गोण्या वाहून नेणारा 16 टायरचा मालट्रक रस्त्याच्या मधोमध उलटला. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुमारे सहा तास ठप्प झाली. यामुळे कल्याणरोडपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हा ट्रक नगर – मनमाड मार्गेकडे राजस्थानला चालला होता. दोन क्रेनच्या साह्याने मालट्रक बाजूला काढण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर दुपारी या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अड्डाच्या पर्दाफाश

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24