गावठी कट्ट्यांसह त्या दोघा जणांना अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : श्रीरामपूर शहर पोलिसांनी अशोकनगर भागात शुक्रवारी रात्री १० वाजता दोघांकडून जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा हस्तगत केला असून याबाबत दोघांना अटक करण्यात आली.

याबाबत पोलिस कॉन्स्टेबल किशोर सुभाष जाधव यांनी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे. शुक्रवारी ५ जून रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास

अशोकनगर भागात कारेगावकडून पल्सर गाडीवरून दोघेजण येत असून त्यांचेकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार अशोकनगर निपाणी वडगाव शिवारात दोघेजण बजाज पल्सर मोटारसायकलने (एमएच १७ सीके ७३०२) आले. पोलिसांनी त्यांना अडवून झडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा व एक के एफ व ९ एमएम असे लिहिलेले जिवंत काडतूस सापडले.

पोलिसांनी सुनील देवराम पवार (वय २३, रा. अशोकनगर, निपाणी वडगाव), अजित बबन आसने (वय २५, रा. कारेगाव, ता. श्रीरामपूर) यांना अटक केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24