अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा :- मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी रेल्वे स्टेशनवर आलेल्या पाहुण्यांना आणण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला.
यात डोक्यावरून चाक गेल्यामुळे तालुक्यातील लिंपणगाव येथील तरुण महादेव अंबादास काळे (वय २८) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दि.३ रोजी पहाटे साडेपाच ते सात वाजण्याच्या दरम्यान घडली.
हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून
सदर घटनेबाबत मयत काळे यांचे भाऊ रामकिसन अंबादास काळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तालुक्यातील लिंपणगाव येथील मयत तरुण महादेव काळे यांच्या एक वर्षीय मुलाचा आज पहिलाच वाढदिवस होता. त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी श्रीरामपूरवरून रेल्वेने नातेवाईक दौंड येथे येणार होते
हे पण वाचा :- कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नगर मध्ये येत शंकरराव गडाख यांनी केले हे काम !
महादेव हे पहाटे साडेपाच वाजता त्यांची दुचाकी (क्र एमएच १६ एएल ३४२६) हिच्यावरून त्या नातेवाईकांना दौंड रेल्वे स्टेशन येथे घेण्यासाठी निघाले होते.
पहाटे साडेपाच ते सात वाजण्याच्या दरम्यान ते दौंड नगर रस्त्यावरील काष्टी नजीक असलेल्या शांताई लॉन्स समोरून ते दौंडकडे जात असताना कुठल्या तरी अज्ञात वाहानाने काळे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
हे पण वाचा :- नगरच्या युवक- युवतींना चिंता फक्त जोडीदाराची,करिअरपेक्षा रिलेशनशीपला अधिक महत्व
यात काळे हे दुचाकीवरून खाली पडले, मात्र अज्ञात वाहनाचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताबाबत रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांनी मयत काळे यांच्या मोबाईलवरून त्यांच्या भावाला फोन करून ही माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.