लस येणार पण ‘ह्या’ लोकांवर लस परिणाम करणार नाही ; तज्ज्ञांची चिंता

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. आर्थिक घडी पुरती विस्कटलेली आहे. देशभराचा विचार करता महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण जास्त आहे. मुंबई, पुणे यांसारख्या मेट्रोसिटीमध्ये हे प्रमाण लक्षणीय राहिले.

कोरोनाव्हायरसविरोधातील लस कधी येणार याकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत. परंतु ता लस संदर्भात तज्ज्ञांनी एक चिंता व्यक्त केली आहे.

लठ्ठ किंवा जास्त वजन असलेल्या व्यक्तींवर कोरोना लशीचा परिमाण होणार नाही, असं संशोधकांनी म्हटलं आहे. नार्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी केलेला हा अभ्यास ओबेसिटी रिव्ह्यू जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

लठ्ठ लोकांना इतक्या समस्या असतात ज्यामुळे त्यांना श्वसनसंंबंधी आजारांमुळे अधिक त्रास होतो. वजन जास्त असलेल्या लोकांमध्ये याधी एच1एन1 फ्ल्यूची लस परिणामकारक नव्हती.

त्यामुळे आता लठ्ठ व्यक्तींवर कोरोना लशीचाही फारसा परिणाम होणार नाही. अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. सध्या देशाचे लक्ष लशीकडे लागले आहे.

देशात सध्या तीन लसींवर चाचणी सुरु आहे. भारत बायोटेक-आयसीएमआरची कोव्हॅक्सिन, झायडस कॅडिलाची झायकेव्ह-डी तसेच ऑक्सफोर्ड-अ‍स्ट्रॅजेनेका आणि सीरमने तयार केलेली कोव्हीशील्ड ही लस सध्या चाचणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24