कोरोनाशी लढणाऱ्या ‘त्या’ डॉक्टरचा बळी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पुणे सध्या वैद्यकीय पथक कोरोनाशी लढण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहे. परंतु आता त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यात खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या एका डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला.

हे 56 वर्षीय डॉक्टर गेले काही दिवस कोरोनाशी लढत होते. पण त्यांची झुंज अपयशी ठरली.पुण्यात डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू होण्याची पहिलीच घटना आहे. ते ससून रुग्णालयात होते भरती होते.

या डॉक्टरांना इतर कोणताही त्रास नव्हता. मात्र कोरोना संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. रुग्णांना तपासण्याच्या वेळी सर्वात जास्त संपर्काचा धोका वैद्यकीय व्यावसायिकांना असतो.

खासगी डॉक्टरांनीही कुठल्याही रुग्णांना तपासताना पुरेशी सावधानता बाळगत संरक्षक उपकरणांसह तपासणी करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.

पण सर्व डॉक्टरांकडे पुरेशा PPE किट्स आणि इतर आयुधं पुरेश्या प्रमाणात उपलब्ध नसल्याचे चित्र दिसते. पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही.

लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता आणल्याबरोबर पुण्यात रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे. दिवसभरात पुण्यात तब्बल 291 रुग्णांची वाढ झाली. पुण्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4398 वर पोहोचली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24