अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा मंगळवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित होते. याबरोबर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे, डॉ. सुजय विखे पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी स्वत: ला समर्पीत केले होते. ते स्वत: सत्तेपासून व राजकारणापासून अलिप्त राहीले नाहीत.
पण त्यांनी राजकारण हे समाजासाठी केले आहे. गाव व गरिबांच्या प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. आजही विखे पाटील कुटुंबाचे प्रत्येक पक्षात चांगले संबंध आहेत,’ पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले,
गाव आणि गरिबांच्या विकासासाठी यांचे योगदान आहे. येणाऱ्या पिढीला त्यांची प्रेरणा मिळेल. हे पुस्तक युवकांसाठी व आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. गाव, गरिब व शेतकऱ्यांचे दुख: त्यांनी स्वत: पाहिले.
त्यामुळे शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांनी सहकारातून विकास केला. या सोहळ्यात विखे पाटील यांच्या सन्मानार्थ प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नामांतर करुन,
त्या संस्थेला ‘लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था’असे नाव दिले जाणार आहे. दरम्यान, राधाकृष्ण विखे यांनी पुस्तकातील गौप्यस्फोटाबाबत माहिती न देता आपल्यासही याबाबत उत्कंठा असल्याचे म्हटले होते.
त्यामुळे बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राविषयी राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागली आहे. बाळासाहेब विखे-पाटील यांनी
आपल्या दीर्घ राजकीय कारकीर्दीत अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांसोबत काम केले होते. कृषी आणि सहकार क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved