अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- श्रीरामपूर नगरपालिकेच्या दरबारी आता पाणी प्रश्न तापू लागला आहे. विविध समस्यांच्या प्रश्नी विरोधक सत्ताधार्यांना कोंडीत धरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
नुकताच उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे तीन तेरा वाजले असून त्याला अकार्यक्षम नगराध्यक्षाचा कारभार जबाबदार असल्याची टीका केली.
मागील तीन वर्षांपासून पालिकेचा पाणीपुरवठा रामभरोसे आहे. गेल्या काही महिन्यात साठवण तलावात सापडलेले मृतदेह असो किंवा,
गाळ मिश्रित व विशिष्ट वास असलेले पाणीपुरवठा असो अशा प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार पालिका प्रशासन करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
हंडा आंदोलनाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी उपस्थितांनी पाणीपुरवठा अभियंता ईश्वरकट्टी यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली.
मात्र संबंधित अधिकारी मात्र निरुत्तर झाल्याचे दिसून आहे. यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, पक्षप्रतोत संजय फड,
शहराध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेवक दिलीप नागरे, सुभाष तोरणे, सुहास परदेशी, दिपक कदम, रितेश एडके, संजय गोसावी, राहुल बागुल आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved