‘निळवंडे’चे पाणी शेवटपर्यंत पोहोचणारच ! पाणी चोरीवर वॉच ठेवण्यासाठी भरारी पथके, कॅमेरे..’असं’ केलंय जबरदस्त नियोजन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : बहुप्रतीक्षित निळवंडेच्या कालव्यांचे नियोजन पंतप्रधान मोदी यांनी केले. त्यानंतर पाणी देखील सोडण्यात आले. अनेक भागात कालव्याचे पाणी पोहोचल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण देखील आहे. दरम्यान काही शेतकऱ्यांत,

काही भागात पाणी पोहोचणे, पाणी चोरी आदींबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता प्रशासनाने आधिकारी व शेतकऱ्यांची समन्वय बैठक शिर्डी येथे काल सोमवारी घेत याबाबतचे नियोजन स्पष्ट केले आहे.

* अनुचित प्रकारांवर असणार वॉच

निळवंडे कालव्याद्वारे पाणी येताना, तसेच त्याद्वारे पाझर तलाव भरत असताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार व पाणी चोरी होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. यासाठी विशेष म्हणजे भरारी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.

या पथकाबरोबर कॅमेरा देखील असणार आहेत. त्यामुळे संपूर्णनियोजन अगदी शानदार करण्यात आले आहे अशी माहिती गटविकास उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी दिली.

* भरारी पथकात कोणाचा असासणार समावेश

या पथकामध्ये महसूल, पोलिस विभाग, जलसंपदाचे प्रतिनिधी असतील. त्यांना सहकार्य करायला गावातील पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक आदी असणार आहेत. या पथकामुळे पाणी शेवटच्या पाझर तलावात पूर्ण क्षमतेने पोहचेल असा विश्वास प्रशासनाला आहे.

* शिर्डीत बैठक

निळवंडे कालव्याद्वारे कोपरगाव तालुक्यातील सर्व पाझर तलाव भरून द्यावे या मागणीसाठी रांजणगाव देशमुख येथे काही शेतकरी उपोषणाला बसले होते. यावेळी आंदोनकर्त्यांना आधिकारी व शेतकऱ्यांची समन्वय बैठक घेऊ असं आश्वासन दिल होत.

त्यानुसार शिर्डी येथे सोमवारी ही बैठक आयोजित केली गेली. या बैठकीसाठी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, जलसंपदाचे उपकार्यकारी अभियंता महेश गायकवाड, कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले, संगमनेरचे तहसीलदार धिरज मांढरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. व वेगवेगळ्या समस्यांवर विविध उपाययोजना कशा करता येतील यावर देखील चर्चा झाली.