धोकेबाजांची खैर नाही; शेतकऱ्यांच्या माहितीसाठी पोलीस प्रशासन उतरले मैदानात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- गेल्या अनेक महिन्यांपासून असलेल्या कोरोना संकटाशी बळीराजाने दोन हात केले. हे संपते तोच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला.

यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी राहिले साहिलेले पिकाचा सौदा व्यापाऱ्यांशी केला तर आता इथेही बळीराजाची मोठी फसवणूक होत आहे.

श्रीरामपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आपला शेतमाल परराज्यांसह विविध जिल्ह्यांतील अनोळखी व्यापार्‍यांना विक्री करतात.

त्यात विविध ठिकाणच्या व्यापार्‍यांकडून तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

व्यापार्‍यांकडून तालुक्यातील शेतकर्‍यांची वारंवार होणारी फसवणूक रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासन मैदानात उतरले आहे. शेतकर्‍यांनी अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन वरीष्ठ पोलिस अधिकारी नोपाणी यांनी केले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये व्यापार्‍यांकडून तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

अनेकांना शेतमालाचे पैसे म्हणून धनादेश देण्यात आले आहेत. परंतु, हे धनादेश बँकेत भरण्यासाठी गेल्यानंतर ते रद्द होतात, तसेच संबंधित व्यापार्‍याचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक खोटे असल्याचे समोर येतात.

त्यामुळे शेतकर्‍यांकडे संबंधित व्यापार्‍यांची कुठलीही माहिती किंवा ओळख नसल्याने स्थानिक पोलिसांना कारवाई करताना अडथळे येतात.

परिणामी, शेतकर्‍यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनी परराज्यांसह अन्य जिल्ह्यांतील व्यापार्‍यांना शेतमालाची विक्री करताना संबंधितांचे आधारकार्ड,

पॅनकार्ड पडताळून व्यवहार करावेत, तसेच व्यवहाराचा एक धनादेश जपून ठेवावा. त्यामुळे संबंधित व्यापार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यास पोलिसांना मदत होईल.

परराज्यांतील व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची होणारी फसवणूक रोखण्यास मदत होईल. याबाबत शेतकर्‍यांनी अधिक सतर्कता राखण्याचे आवाहन वरीष्ठ पोलिस अधिकारी नोपाणी यांनी केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24