अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-वाहतूक नियमन करताना एका महिला वाहतूक पोलिसाने अनोख्या पद्धतीने लाच स्वीकारली. संबंधित कर्मचारी थेट खिशात पैसे घेत असल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली.
यावरून ‘कसुरी अहवाल’ वरिष्ठांकडे सादर करण्यात आला. त्यानंतर महिला पोलिसाचे निलंबन करण्यात आले. संबंधित पोलिस कर्मचारी वाहतूक शाखेच्या पिंपरी विभागात कार्यरत आहेत.
पिंपरी येथील साई चाैक येथे मंगळवारी (दि. १५) काही पोलीस वाहतूक नियमन करीत हाेते. त्यातील त्या महिला पोलिसाने दुचाकीवरून आलेल्या दोन महिलांना थांबविले. त्यावेळी काही जणांनी मोबाईलमध्ये याची व्हिडीओ क्लिप तयार केली.