अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- मुदत संपुष्ठात आलेल्या जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींमधील सदस्या पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षण आणि सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
निवडणुकांचे बिगुल वाजले असल्याने नेतेमंडळींसह कार्यकर्ते देखील निवडणुकांच्या कामामध्ये व्यस्त झाले आहे. यातच जिल्ह्यातील शेवगाव आणि जामखेड पालिकांचा समावेश आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने शेेवगाव आणि जामखेडमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रारूप प्रभाग रचनाचा प्रस्ताव, प्रभागांची संख्या,
त्यांची प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या क्षेत्र, सीमांकन नकाशा,
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण यासह जिल्ह्याधिकार्यांकडे सादर करण्याची मुदत 11 नोव्हेंबर2020 आहे. याची जबाबदारी मुख्याधिकार्यांवर आहे.
यावर जिल्हधिकारी 20 नोव्हेंबर 2020पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देतील. 24 नोव्हेंबर रोजी सदस्य पदांच्या आरक्षणाच्या सोडतीसाठी नोटीस प्रसिध्द केली जाईल.
27 नोव्हेंबर रोजी आरक्षणाची सोडत काढली जाईल. हरकती व सूचना मागविण्याची अंतिम तारीख 9 डिसेंबर आहे. 15 डिसेंबरला या हरकतींवर निर्णय घेतला जाईल. त्यानंतर 24 डिसेंबरला अंतिम प्रभाग रचनेस मान्यता दिली जाईल.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved