महाराष्ट्र

‘या’ शेतकऱ्याने घेतले डाळिंब बागेत आंतरपीक मिळवले डबल उत्पादन

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Krushi news:- शेतकऱ्याला निसर्गाच्या लहरीपणा मुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहेत. त्यात ऐन पीक काढणीच्या वेळी आलेल्या अवकाळी पाऊस तर कधी गारपीट, कधी ढगाळ वातावरण, कधी धुके, तर कधी शीतलहरीचा कहर यामुळे बळीराजा हतबल झाला आहे.

सतत बदलते वातावरण आणि त्यामुळे होणारे पिकांचे नुकसान. यामुळे युवकांचा शेती हा तोट्याचा व्यवसाय असा बघण्याचा दृष्टिकोन तयार झाला असून त्याला पुणे जिल्ह्यातील एका तरुणाने शेती ही तोट्याची नसून फायद्याची देखील आहे हे दाखवून दिले.

पुणे जिल्ह्यातील पळसदेव भागातील माळवाडी येथील एका तरुण शेतकऱ्यांनी डाळिंब बागेत कांद्याचे आंतरपीक घेऊन चांगले उत्पादन घेतले आहे. या शेतकऱ्यांनी घेतलेले उत्पादन इतर तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणेचा विषय ठरला आहे.

तुकाराम बनसोडे या शेतकऱ्याने डाळिंबाच्या बागेत कांद्याचे आंतरपीक घेण्याची किमया गेली आसून याच पळसदेव भागात असे शेकडो शेतकरी आहेत. ज्यांनी तेल्या रोगाला कंटाळून आपल्या डाळिंबाच्या बागा शेतातून काढून टाकल्या आहेत.

मात्र तुकाराम यांनी या परिसरात नामशेष होत असलेल्या डाळिंब बागातूनच दर्जेदार उत्पन्न मिळवण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने त्यानी डाळिंब लागवड करून त्यात आंतरपीक पद्धत देखील यशस्वी करून दाखवली आहे.

डाळिंब लागवड केल्यापासून सुमारे दीड वर्षानंतर डाळिंबाच्या पिकापासून उत्पादन मिळण्यास सुरवात होते. तोपर्यंत डाळिंबाच्या बागेतील दोन रोपा मधीन मोकळ्या जागेचा आंतरपीक म्हणून उपयोग करता येऊ शकतो.

तर डाळिंबाची बाग जोपासण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित असतो. हा खर्च भागवण्यासाठी तुकाराम यांनी डाळिंबाच्या बागेत कांद्याची आंतरपीक म्हणून लागवड करून खर्च भागवण्याचे ठरवले. मात्र त्यांना पहिल्याच प्रयोगात अपयश आले.

त्यांनी त्यातून न खचता पुन्हा एकदा कांद्याची लागवड केली. तर त्यांचे कांद्याचे पीक आता डाळिंबाच्या बागेत चांगली भरले असून सध्या कांद्याला 20 ते 25 रुपये प्रति किलो असा दर मिळतो आहे.

तर त्यांना डाळिंबाच्या बागेत कांद्याचे आंतरपीक घेण्यासाठी 90 हजार रुपये एकरी खर्च आला असून त्यातून त्यांना जवळपास चारशे ते पाचशे कांद्याच्या पिशव्या उत्पादन निघून लाखोंचा नफा होणार आहे.
एकंदरीत, मिश्र पीक पद्धतीने शेती करण्याचा त्यांचा निर्णय हा योग्य ठरला आहे.

Ahmednagarlive24 Office