पारनेर :- तालुक्यातील हंगा भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील, १७ वर्ष वयाच्या अल्पवयीन तरुणीला भरदिवसा आरोपी अजित राजेंद्र आल्हाट, रा. हंगा याने काहीतरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले.
मुलीच्या वडिलांनी सुपा पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अल्पवयीन मुलीस पळविणारा आरोपी अजित आल्हाट याच्याविरुद्ध भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून हेकॉ साळवे हे आरोपीचा व मुलीचा कसून शोध घेत आहेत.