अहमदनगर ब्रेकिंग : तरुणावर सपासप वार करून बेदम मारहाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शहरातील उपनगर बोल्हेगाव येथे जयभवानी चौकात अजय विलास वाघ रा.बालाजी नगर , बोल्हेगाव, यांना रस्त्यात अडवून तीन – चार जणांनी बेदम मारहाण करत मांडीवर चाकु सारख्या दिसणाऱ्या धारदार हत्याराने वार केले.

हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक सरपंचाचे पद अखेर रद्द

अचानक झालेल्या या हल्ल्यामध्ये वाघ हे जखमी झाले. त्यानंतर शिवीगाळ व दमदाटी करून गुन्हेगार पळून गेले . या प्रकरणी अजय वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हे पण वाचा :- खासदार सुजय विखे म्हणाले ‘विखे पॅटर्न’ संपलेला नाही !

सुशांत नांगरे , गणेश कु – हाडे , विनायक गारुडकर याच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे . गणेश कु-हाडे याने वाघ यांच्या पाठीमागून उजव्या मांडीवर चाकू सारख्या दिसणाऱ्या धारदार हत्याराने वार केल्याने ते जखमी झाले. दरम्यान वाघ यांच्यावर हल्ला केल्यानतंर गुन्हेगार पसार झाले होते.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अड्डाच्या पर्दाफाश

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24