महाराष्ट्र

तरुणांनी हद्दच केली ! वाढदिवसाचा केक कापला नाही म्हणून केला होता ‘तो’ पेट्रोल बॉम्ब हल्ला

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील चंद्ररंग डेव्हलपर्स या कार्यालयावर 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचा सांगवी पोलिसांनी उलगडा केला आहे.

यात तिघांना अटक करून दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा उलगडा झाला असून, या तरुणांचा प्लॅन ऐकाल तर नक्कीच थक्क व्हाल. तन्मय रामचंद्र मदने (वय 19, पिंपळे गुरव), विक्रम विजय जवळकर (वय 20, रा. रेल्वे समोर, कासारवाडी), प्रद्युम्न किशोर भोसले (वय 23, पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. शंकर जगताप यांच्या कार्यालयावर झालेल्या पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचा उलगडा झाला आहे. आरोपींनी तोंडाला मास्क, गाडीच्या नंबर प्लेटवर चिकटपट्टी लावली होती. त्यामुळे आरोपींना ओळखता येत नव्हते. पोलिसांनी गाडीच्या रंगावरून शोध सुरू केला.

काही तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. विक्रम जवळकर याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी गुन्हेगारांना पुरविली होती. त्याच्या घरी गोठ्यात या गुन्ह्याचा कट रचण्यात आला होता. प्रद्युम्न भोसले याचा 7 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता.

वाढदिवसानिमित्त “मास्टरमाईंड” असे लिहिलेला केक घेऊन आरोपी तन्मय व आरोपी प्रद्युम्न हे त्यांच्या मित्रांसोबत चंद्ररंग डेव्हलपर्स या कार्यालयात शंकर जगताप यांच्या हस्ते केक कापण्यासाठी आले होते. परंतु शंकर जगताप हे त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे केक न कापता त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत गाडीत बसून निघून गेले.

याचा राग प्रद्युम्न भोसले यांच्या मनात होता. दरम्यान, दीड वर्षापूर्वी चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नगरसेवक दत्ताकाका साने यांचे ऑफीस काही गुंडानी फोडले होते व दहशत निर्माण केली होती. या गुन्हयात प्रद्युम्न याचा वर्गमित्र सॅमसग अॅमेट, देवेंन्द्र बिडलान हे सहभागी होते.

त्या गुन्ह्यामध्ये दत्ताकाका साने यांच्या राजकीय विरोधक नेत्याचे नाव न घेण्यासाठी त्यांना मोठी रक्कम मिळाली होती. सुमारे 20 लाख रुपये एवढी रक्कम मिळाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही.

त्याचप्रमाणे या गुन्ह्यातसुध्दा जर तन्मय मदने व त्याचे साथीदार पकडले गेल्यास तोच फॉर्मुला वापरून शंकर जगताप यांच्या विरोधकांकडे नाव न घेण्यासाठी मोठ्या रक्कमेची मागणी करायची असे नियोजन प्रदयुम्न भोसले व तन्मय मदने याने केले होते.

नियोजन प्रत्यक्षात आणण्यासाठी तन्मय याने विक्रम विजय जवळकर व दोन विधी संघर्षित बालक यांना कटात सामावून घेतले. वरीलप्रमाणे कट अंमलात आणला. हा पेट्रोल बॉम्ब बनविण्यासाठी तन्मय याने ज्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल विकत घेतले,

भंगार दुकानातून जुन्या बाटल्या घेतल्या व ज्या पान शॉपमधून लायटर विकत घेतला या सर्वांकडे पोलीसांचा तपास चालू आहे. आरोपी तन्मय मदने हा सुखवस्तु कुटुंबातील आहे. त्याचे वडील डोळ्यांचे डॉक्टर आहेत. तन्मय तसेच विधी संघर्षित बालके, विक्रम जवळकर, प्रदयुम्न भोसले यांचा हा पहिलाच गुन्हा असून त्यांचा गुन्हेगारी इतिहास नाही.

परंतु गुन्हेगारी इतिहास असलेले सॅमसग अॅमेंट, देवेंन्द्र बिडलान यांच्यावर पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरामध्ये गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपी प्रदयुम्न भोसले हा त्यांचा वर्गमित्र असल्यानेच इझी मनी व शंकर जगताप यांनी त्याच्या वाढदिवसाचा केक न कापल्याचा राग मनात असल्याने हा गुन्हा केलेला आहे.

Ahmednagarlive24 Office