अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : राज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ जागा लवकरच रिक्त होत असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरवले तर श्रीरामपूरचे युवा नेते अविनाश आदिक लवकरच आमदार होवू शकतील ,अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांपैकी १० सदस्यांची मुदत ५ जूनला संपली उर्वरित सदस्यांची मुदत १५ जूनला संपणार आहे तिन्ही पक्षांना चार चार जागा मिळणार असल्याने काँग्रेस राष्ट्रवादी , शिवसेना पक्षाकडून अनेक इच्छुकांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
तसे झाल्यास श्रीरामपुरात अविनाश आदिक यांच्या रुपाने आणखी एक आमदार मिळू शकतो , अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक हे कित्येक वर्षापासून राष्ट्रवादीचे युवा नेते अजितदादा पवार यांच्या बरोबर धडाडीने पक्षाचे काम करत आहेत.अजितदादांचे विश्वासू सहकारी म्हणून अविनाश आदिकांकडे पाहिले जाते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार र विशेष ऋणानुबंध आहेत . नव्हेतर स्थापनेच्यावेळी दिल्लीत राष्ट्रवादीची मोट बांधणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर स्व गोविंदराव आदिक यांनी खांद्याला खांदा लावून दिल्लीत पक्षाचे काम केलेले आहे .
स्व . गोविंदराव आदिक यांची इंग्लिश , हिंदीवर असणारी पकड तसेच वाक्चातुर्य यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय राष्ट्रवादी आदिकाचे मोलाचे योगदान होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर अनेक वर्ष वर्ष एक विश्वासू सहकारी म्हणून स्व . गोविंदराव आदिक यांनी राज्याच्या राजकारणात काम केले आहे.
स्व. गोविंदराव आदिकांचे चिरंजीव असणारे अविनाश आदिक यांना पवार कुटुंबियांकडून या विधानपरिषदेच्या जागेवर वर्णी लागू शकते अविनाश आदिक यांनाही आपल्या परीने पक्षात चांगले काम विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने मोठी भरारी घेतलेली आहे.
एका विश्वासू युवा नेतृत्वास संधी देण्याचा निर्णय पवार परिवाराकडून झाल्यास श्रीरामपूरचे भूमिपूत्र असणारे अविनाश आदिक यांचे नाव राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून राष्ट्रवादीकडून दिले जावू शकते.
तसे झाल्यास श्रीरामपुरात अविनाश आदिक यांच्या रुपाने आणखी एक आमदार मिळू शकतो , अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews