अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- चांगला बंगला, खाते यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भांडू नये. मंत्री नीट न वागल्यास उद्धव ठाकरे केव्हाही सत्तेतून बाहेर पडतील आणि ग्रामीण भागाकरिता काम करणारे सरकार राहणार नाही, असा इशारा माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी व्यक्त दिला.
हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : आमदार निलेश लंकेंच्या गावात तरुणाचा खून
मंत्री शंकरराव गडाख व जि. प. अध्यक्ष राजश्री घुले यांचा सत्कार रविवारी ज्ञानेश्वर सांस्कृतिक प्रतिष्ठान येथे करण्यात आला त्या वेळी गडाख बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नरेंद्र घुले होते. पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजारे, नगराध्यक्ष योगिता पिंपळे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांचाही सत्कार झाला.
हे पण वाचा :- अल्पवयीन मुलीवर घरात बलात्कार ! नातेवाईकांनी दिली मुलीलाच जिवे ठार मारण्याची धमकी …
यशवंतराव गडाख म्हणाले ”शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा धाडसी निर्णय घेतला म्हणून आजचा सुवर्ण दिन दिसत आहे. मात्र मंत्री नीट न वागल्यास आणि शारीरिक, मानसिक स्वास्थ्य न लाभल्यास उद्धव सत्तेतून बाहेर पडतील. त्यामुळे भांडू नका, असा सल्ला त्यांनी दिला.
हे पण वाचा :- माजी आमदार शिवाजी कर्डिले नाही होणार भाजपचे जिल्हाध्यक्ष !
स्व. वाघ यांच्या निवासस्थानी बाळासाहेब थोरात यांची भेट झाली आणि मी त्यांना म्हणालो, तीन पक्षाचे सरकार टिकेल का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरळ-साधे आहेत आणि शब्द पाळणारा माणूस आहे. खातेवाटप व बंगल्यासारख्या किरकोळ कारणांचा अट्टाहास धरून नाराज होऊ नका.
हे पण वाचा :- पत्रिका नसली, तरी लग्नाला जा…हरिभाऊ बागडे यांचा अहमदनगरच्या भाजप कार्यकर्त्यांना सल्ला !
संधी मिळाली त्याचे सोने करा. उद्धव ठाकरे कसलेले कलावंत असून सरळ व साधे आहेत. तुम्ही तिन्ही पक्षांचे मंत्री एकसंध राहिला नाहीत, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या सदस्यांनी थोडे सबुरीने घ्या. ठाकरे यांना मानसिक व राजकीय स्वास्थ्य द्यायचे असेल तर नीट वागा’, असा सल्ला यशवंतराव गडाख यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला दिला.
हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले….
‘शब्द पाळणारे ठाकरे आहेत त्यामुळेच शंकरराव आमदार झाले. शहरी सरकार जाऊन ग्रामीण सरकार आलं आहे. बंगले, ऑफिस पाहिजे यावरून अडून बसण्यापेक्षा जनतेत येऊन बसा, कामे करा. ग्रामीण भागात जाऊन कामे करा. मी शंकरराव गडाख यांच्या पाठीशी आहे पण पक्षात आलेलो नाही. मुखमंत्र्यांना तालुक्यात बोलवा आणि तालुक्याचे प्रश्न सोडवा. आजचा सत्कार नेवासे व शेवगावच्या मनोमिलनाचा आहे आणि सर्व पक्षाच्या वतीने आहे, असे गडाख यांनी सांगितले.