अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- प्रशासक पक्ष वा पार्टीचा नसावा, अधिकारी कर्मचारी असावा हे घटना सांगते मी सांगत नाही. आमचे कायदे, न्यायालयाचे निकाल, राज्यपालांचे निवेदन या सगळयात पक्ष वा पार्ट्यांचा कोठेही उल्लेख नाही. अंमलबजावणीनंतर अर्धे समाधान होईल. पालकमंत्र्यास नेमणूकीचे अधिकार दिल्यास गावपातळीवर हाणामाऱ्या होतील.
निवडणूकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. वित्त आयोगाच्या पैशांच्या वाट्यावरून डोकी फुटतील हा धोका पालकमंत्री मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे हजारे यांनी सांगितले. राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचातीवर अशासकीय प्रशासक नेमण्याच्या शासनाच्या निर्णयावर अद्याप समाधानी नसल्याचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज स्पष्ट केले.
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगण सिध्दी येथे भेट घेतली. यावेळी मुदत संपलेल्या ग्रामपंचातीवर अशासकीय प्रशासक नेमणच्या राज्य सरकारच्या भूमिकेवर उभयंतामध्ये चर्चा झाली. यावेळी पालकमंत्र्यांनी सरकारची भुमिका पटवून देत, अद्याप न्यायालयाचा निर्णय राखीव असल्याचे सांगितले.
यावर अण्णा हजारे यांनी आधीच सरकारच्या अशासकीय प्रशासक नेमण्याच्या भूमिकेचा विरोध करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केला होता.अण्णा हजारे यांनी यावेळी मुश्रीफ यांना सागितले की त्या मुदत संपलेल्या ग्रामपंचातीवर अशासकीय प्रशासक नेमल्याने त्या ठिकाणी अनेक पक्षाचे कार्येकर्ते या पदावर बसतील व यामुळे गावागावात पक्ष पार्ट्यामुळे भांडणे मारामाऱ्या होतील.
त्यामुळे प्रशासक म्हणून ग्रामसेवक, तलाठी किंवा सरकारी कर्मचारी असावा. ग्रामपंचायतींवर नेमण्यात येणाऱ्या प्रशासकासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असून, त्यावर सोमवारी अंतिम निर्णय होणार आहे. या निर्णयानंतरच प्रशासकासंदर्भात शासन निर्णय घेईल असे पालकमंत्र्यांनी हजारे यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, मुश्रीफ यांच्या भेटीनंतर आपले निम्मे समाधान झाले आहे, अंमलबजावणीनंतर निम्मे होईल असे हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com