अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :-भगवान शिवाच्या भक्तांसाठी भारताच्या विविध भागात 12 ज्योतिर्लिंग आहेत. या ज्योतिर्लिंगांपैकी पाच महत्वाची ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत.
जाणून घ्या महाराष्ट्रातील या पाच ज्योतिर्लिंगांविषयी…
1. घृष्णेश्वर : घृष्णेश्वर दर्शनासाठी सर्व पुरुषांसाठी एक खास नियम आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी पुरुषांनी चामड्यापासून बनलेल्या सर्व वस्तू मंदिराबाहेरच काढून ठेवणे आवश्यक आहे. तरच गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो.
2. भीमाशंकर : भीमाशंकर हे बारा ज्योतीर्लिंगापैकी एक आहे. भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंचीवर घनदाट जंगलाने वेढलेले आहे. हे मंदिर 1200 वर्षापूर्वीचे आहे.
3. औंढा नागनाथ : हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिरातील लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाही. नंदिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे.
4.परळीचे वैजनाथ : देशभरातील बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग म्हणुन परळीचे वैजनाथ प्रसिद्ध आहे. परळीच्या वैजनाथला दक्षिण काशी म्हणुनही संबोधले जाते. मंदिराचा जिर्णोध्दार इंदोरच्या राणी आहिल्याबाई होळकर यांनी केला.
5. त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्याही प्रतिमा आहेत.