विधानपरिषदेच्या जागांवरुन कोणतेही मतभेद नाहीत – जयंत पाटील

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नेमणुकीमध्ये उशीर झाला नाही असे त्यांनी सांगितले. राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत उद्या चर्चा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधानपरिषदेच्या जागावरुन कोणतेही मतभेद नाहीत. असेही ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणुन केलेल्या भाषणामध्ये एकहाती सत्ता द्या या वक्तव्यावर प्रत्येक पक्षाला अपेक्षा बाळगणे आवश्यक असते, त्यात काही वावगं नाही. प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाच्या विकासांचा विचार करायला हवा.

असे त्यांनी सांगितले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) ही केंद्र सरकारच्या योजनेत 400 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. याविषयी विचारले असता जयंत पाटील यांनी याबाबत कल्पना नसल्याचे सांगितले.

देवेंद्र फडणीस यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते रुग्णालयात आहेत. ते लवकर बरे व्हावे अशी आमची सदिच्छा आहे, असे जयंत पाटील यांनी म्हणाले.जयंत पाटील यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे माझ्या संपर्कात नाहीत. मात्र, इतर नेते संपर्कात असल्याचे म्हटले.

एकनाथ खडसेंचा जसा प्रवेश झाला, तसे इतर कोण कोण नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील हे योग्य वेळ आल्यावरच कळेल, असंही पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच पंकजा मुंडे यांनी नेहमीच शरद पवार यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे. ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नावर पंकजा मुंडे यांचे वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे

यांनी शरद पवार यांच्याशी बोलून प्रश्न सोडवले आहेत. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नामध्ये कधीही राजकारण आले नाही. म्हणुन पंकजा मुंडे या बैठकीत उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबद्दल जी भावना व्यक्त केली यात काही चुकचे नाही. आपल्याकडे ज्येष्ठांना आदर दिला जातो. असे जयंत पाटील म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24