अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही, त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हा प्रशासन सर्व प्रकारची खबरदारी घेत आहे. घाबरून जावू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नागरिकांना केले आहे.
दुबईहून व इतर ठिकाणवरुन राज्यात परतलेल्या लोकांची यादीच समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. यामध्ये नगर शहरातील चौघेजण दुबई ट्रिपवरुन परतलेले असल्याचे समोर आले. प्रशासनाने त्यांची खबरदारी घेत चौघांना शोधून तपासणी केली.
मात्र, त्यांच्यामध्ये कोणतेही लक्षणे आढळली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. एकंदरीतच नगर जिल्ह्यात बुधवार (दि.11) पर्यंत एकही कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आलेला नाही अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये नागरिकांनी अफवांना बळी न पडता आरोग्याची काळजी घ्यावी, परिसर स्वच्छ ठेवावा, प्रशासन सज्ज असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या पुण्यातील ‘त्या’ दोघांसोबत नगरच्या एकाच कुटुंबातील चौघांनी विमान प्रवास केल्याने आरोग्य विभाग त्यांच्यावर वॉच ठेवून आहे. या चौघांना कोरोनाचा संसर्ग झाला नसला तरी त्यांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com