अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- कोविड सेंटरसाठी संबंधित मालकाने नटराज हॉटेल मोफत दिले. महापौरांवर टीका करण्यापूर्वी त्यांनी कोणत्या ठिकाणी सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न केले?
असे नमूद करत रात्री आठनंतर शुद्धीत नसताना पत्रक काढणे बंद करा, असा टोला भाजपचे नेते अनिल गट्टाणी यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांना रविवारी लगावला.
नटराज कोविड सेंटरवर ताबा म्हणजे आयत्या बिळावर नागोबा, अशी टीका जाधव यांनी केली होती. या टीकेला गट्टाणी यांनी प्रत्युत्तर दिले. पत्रकात म्हटले आहे,
कोवीडच्या कामात राजकारण न करता जाधव यांनी शुद्धीवर असताना माहिती घेऊन पत्रक काढावे. महापौर, सर्व पदाधिकारी व नगरसेवकांच्या संकल्पनेतून मनपाने भोजन व्यवस्था केली, हे जाधव यांना दिसले नाही.
जाधव यांनी पत्रकबाजी करण्यापेक्षा रुग्णांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करावे. भाजपचे नेते कुठे होते हे विचारण्याची गरज नाही, असा टोलाही गट्टाणी यांनी लगावला.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved