🔴बिग ब्रेकिंग : राज्यात आणखी पंधरा दिवस लॉकडाऊन कायम !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडे आठ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाउन वाढवणार असून निर्बंध थोड्या प्रमाणात शिथील केली जातील असे यापूर्वीच सांगितले होते.

निर्बंध पुढील पंधरा दिवस कायम :- राज्यातील कडक निर्बंध पुढील पंधरा दिवस कायम करण्यात आले आहेत, येत्या पंधरा जून पर्यंत राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.  

कोरोनाची रुग्णसंख्या 18 हजारांवर :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. आज कोरोनाची रुग्णसंख्या 18 हजारांवर आली आहे. ग्रामीण भागात आता रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.

म्हणावे तितके आकडे खाली आले नाहीत :- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणे गरजेचं आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध कायम राहणार असल्याची घोषणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोनाच्या परिस्थितीत आता फरक दिसत आहे परंतु म्हणावे तितके आकडे खाली आले नाहीत.

जनतेवर निर्बंध लादावे लागतात या सारखं दुसरं कटू काम नाही ! कोरोना काळात धान्य वाटप केलं. 55 लाख शिवभोजन थाळ्या मोफत दिल्या. फेरीवाल्यांसाठी निधी दिला. आपला महाराष्ट्र सुरक्षित राहण्यासाठी काम करत आहोत. काही निर्बंध लादावे लागतात. त्यापेक्षा वाईट काम नाही. जी जनता आपल्याला आपलं मानते त्यांच्यावर बंधनं लादणं यापेक्षा कटू काम कोणतंही असू शकत नाही.

राज्यातील निर्बंध कायम राहणार :- रुग्णसंख्या कमी होत चालली असली तरी गेल्या वेळच्या सर्वोच्च संख्येच्या जवळ आपण आता आलो आहोत. दुसर्‍या लाटेतला विषाणू झपाट्यानं पसरतोय. त्यामुळे निर्बंध कायम राहणार आहेत. काही जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव अजूनही वाढत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

परिस्थिती थोडीशी कमी झाली आहे. पण … कोरोना लाट खाली यायला लागली आहेत. त्यामुळे निर्बंध काढणार का? असं काही लोक विचारत आहोत. आपली आजची परिस्थिती थोडीशी कमी झाली आहे. पण आजची जी मृतसंख्या ही गेल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्याच्या बरोबरीचं आहे. गेल्यावेळीची लाट ही सणासुदीनंतर आली होती. अजूनही आपण म्हणावं तेवढ खाली आलोलो नाही.

ग्रामीण भागात हे प्रमाण वाढताना दिसत आहे :- रुग्णसंख्या कमी होत आली असली तरी गेल्यावेळीची सर्वोच्च रुग्णसंख्येच्या बरोबरीची संख्या आहे. रुग्णसंख्या कमी असली तरी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात रुग्णसंख्या हल्कीशी वाढताना दिसत आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण वाढताना दिसत आहे. हे प्रमाण आपल्याला थांबवायला हवं.

अहमदनगर लाईव्ह 24