लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात असणार 5 झोन, असे असतील नियम आणि अटी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- आजपासून 31 मे पर्यंत देशात लॉकडाऊन 4.0 लागू करण्यात आला आहे. दरम्यान गृह मंत्रालयाने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

देशात आता असतील 5 झोन

ग्रीन, ऑरेंज, रेड, कंटेन्मेंट, आणि बफर झोन

‘या’ गोष्टी रहातील बंद !

खासगी बस, मेट्रो, लोकल बंदच राहणार आहेत. दोन प्रवाशांपेक्षा अधिक व्यक्तींची ने-आणि टॅक्सीने करता येणार नाही, तर रिक्षात फक्त एका प्रवाशासाठी परवानगी आहे.

फक्त अत्यावश्यक सेवेत असलेल्या व्यक्तींना कामानिमित्त घराबाहेर पडता येईल. तसेच सामान्य नागरिकही अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर येऊ शकतात. बाहेर पडल्यानंतरही त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील.

होम क्वारंटाइन असणाऱ्या लोकांना त्याचे नियम पाळावे लागतील. त्यांचे उल्लंघन केल्यास दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे. तसेच या व्यक्तींना सरकारी क्वारंटाइन कक्षात ठेवण्यात येईल. पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी कायम आहे.

‘त्यांनी’घराबाहेर पडू नये !

रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत जीवनावश्यक सेवा वगळता सक्त संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 65 वर्षांवरील नागरिक, इतर व्याधी जडलेल्या व्यक्ती, गर्भवती आणि दहा वर्षांखालील मुले

यांनी अत्यावश्यक किंवा आरोग्यविषयक कारण वगळता घराबाहेर पडू नये, असेही या नियमावलीत स्पष्ट केले आहे.

या आहेत नियम आणि अटी :- 

  • आंतरराज्य बसेस चालवण्याचा निर्णय राज्य घेईल
  • लग्नात 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे गुन्हा, सर्वानी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य
  • लॉकडाऊनचे उल्लंघन करणे कायदेशीर गुन्हा असेल,
  • अंत्यसंस्कारात 20 पेक्षा जास्त नागरिकांना परवानगी नसेल.
  • सरकारी अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप केल्यावर कारवाई

या गोष्टी रहातील सुरु 

  • दूध, भाजी, फळ, बेकरी मांस, मासे, अंडी विकणारी दुकानं
  • प्राण्यांचे दवाखाने, पेट्रोल पंप, घरगुती गॅस पुरवणाऱ्या संस्था,
  • तेल कंपन्या, त्यांची गोदामं आणि दळणवळण व्यवस्था
  • अन्न, औषधं आणि किराण्याची डिलिव्हरी करणाऱ्या ई-कॉमर्स सेवा
  • सरकारी ऑफिसेस, दुकानं आणि संस्था कमीत कमीत कर्मचारी संख्येसह
  • बँका, एटीएम, इन्शुरन्स कंपन्या आणि वित्तसंस्था
  • प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमं
  • मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर, पोस्ट, इंटरनेट आणि डेटा सेवा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24