ऑनलाईन शिक्षणाचे व शिक्षकांचे होणार ऑडिट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. यावर पर्याय म्हणून आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षणवर्ग शाळेतर्फे सुरू करण्यात आले.

आता शैक्षणिक कामकाजाचा लेख जोखा , संबंधित शिक्षकांच्या कामाचा तपशील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने मागविण्यात आला आहे.

त्यामुळे आता राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील सर्व विषयांच्या अध्यापन करणार्‍या शिक्षकांना दर आठवड्यात विद्यार्थ्यांची संपर्क ठेवण्यासाठी ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात केलेल्या

प्रयत्नांची माहिती या लिंकवरती सातत्याने भरावी लागणार आहे. त्यामुळे किती विद्यार्थ्यांचे शिक्षण राज्यात सुरू आहे. किती विद्यार्थी ऑफलाईन, ऑनलाईन शिवाय संपर्कात नाहीत याची माहिती राज्य सरकारला प्राप्त होणार आहे.

राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गाला अध्यापन करणार्‍या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये काम करणार्‍या प्रत्येक शिक्षकाने आपल्या कामाचा तपशील व विचारलेल्या माहितीच्या

अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्यावतीने देण्यात आलेल्या लिंक वरती भरणे अनिवार्य करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व शाळांची माहिती व शिक्षकांची माहिती संकलित करण्याच्या दृष्टीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकमध्ये माहिती भरणे.

त्यासंबंधी शिक्षकांना अडचणी आल्यास शिक्षकांना सहाय्य करण्याच्यादृष्टीने व मार्गदर्शनासाठी प्रत्येक जिल्ह्यात संपर्क प्रमुख नेमण्यात आले आहेत. त्यात जिल्ह्यातील माहिती संकलित करण्यासाठी या लिंकव्दारे प्रयत्न केले जात आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24