थेरगाव क्वीन म्हणतेय…‘मेरा ब्रँड अलग है, झुकेगा नहीं साला..’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  थेरगाव क्वीन म्हणून गाजणाऱ्या मुलीची कमाल पाहा, पोलीस अटक करून नेत असतानाही तिनं ‘रील’ केलं. त्यातले शब्द असे.. ‘मोठी हस्ती आपन, किरकोळ थोडीये?’ १८ वर्षांची, किरकोळच दिसणारी निमशहरी मुलगी.

साडेतीन सेकंदांच्या रील्सच्या लोकप्रियतेच्या जोरावर स्वत:ला ‘क्वीन’-‘डॉन’ म्हणवून घेऊ लागली. अर्वाच्य शिव्या देत ‘ॲटिट्यूड- डेअरिंग’च्या नावाखाली फाॅलोअर्सची संख्या वाढवते.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पिंपरी पोलिसांनी थेरगाव क्विन म्हणून सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या साक्षी श्रीश्रीमळ तरूणीला ताब्यात घेतलं होतं.

सोशल मीडियावर शिवीगाळ करणारे व्हिडीओ अपलोड करत असे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी स्वंयघोषित थेरगाव क्विनसह एकूण तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली होती.

तिचा ‘कुठला डॉन आणि कुठला कोण? माझ्या नादी लागाल तर करील 302’ हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी केली होती.

अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तिच्यावर कारवाई करत तिला अटक केली. साक्षी सध्या जामिनावर बाहेर आहे. पोलिसांनी अटक केली

त्यावेळचा देखील व्हिडिओ इंस्टाग्राम वर टाकण्यात आलेला असून पोलिस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर संबंधित तरुणीची परिसरात चांगलीच मिरवणूक काढण्यात आली होती. पोलिसांच्या कारवाईचा या थेरगाव क्वीनवर काही परिणाम झालेला दिसत नाही असेच एकंदरीत चित्र आहे.