अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- भारत एक विकासशील देश आहे आणि आतापण या देशात 40 टक्के लोक हे गरिबी रेषेच्या खाली आहेत आणि नजाने कसे आपले जीवन जगतात देशाच्या प्रत्येक चौकात आणि गल्लीत आपल्याला भरपूर लोक भिक मागताना दिसतील.
ज्यांना तुम्ही कदाचित 1-2 रुपये पण देत असाल पण जरा विचार करा कि ज्या भिकारीला तुम्ही भिक देत असाल ते भिकारी जर एक करोडपती निघाला तर आपली काय प्रतिक्रिया असेल?
पण असे देखील घडलेले आहे. मुंबईच्या परळ भागामध्ये दिवसाचे दहा तास भिक मागणाऱ्या 49 वर्षीय भरत जैन उत्कृष्ट इंग्रजी बोलू शकतो. महिन्याला सत्तर ते ऐंशी हजार रुपये सहज कमाविणाऱ्या भरतच्या मालकीच्या मुंबईमध्ये दोन सदनिका असून, मुंबईतील उपनगरामध्ये दोन दुकानेही भरतच्या मालकीची आहेत.
ही दोन्ही दुकाने भरतने इतरांना चालविण्यास दिली असून, त्यापासूनही त्याला चांगली मासिक मिळकत होत असते. संभाजी भिखारी मुंबई च्या स्लम क्षेत्र विरार चे आहेत याची रोजची आमदनी 1500 रुपये आहे तसेच त्यांचे स्वताचे 2 फ्लॅट आणि स्वताची 2 घरे आहेत आणि यांनी बैन्केत निवेश पण केले आहे .
बिहारमधील पटना शहरामध्ये भिक मागणाऱ्या पप्पू कुमार याचा बँक बॅलन्स लाखोंच्या घरात आहे. पप्पू अपंग असल्याने त्याच्या शारीरिक अपंगत्वावर दया येऊन लोक त्याला पैशाची मदत करीत असतात. पप्पू कुमारचा परिवार पटना येथे स्थायिक असून, त्याचा मुलगा प्रतिष्ठित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे. सर्वितीया देवी पटनाच्या रहिवासी आहेत.
त्यांचे स्वतःच्या मालकीचे घर असून, इतर संपत्तीही भरपूर आहे. भिक मागून कमाविलेल्या पैशांमधून यांनी आपल्या मुलीचे थाटामाटात लग्न करून दिले असून, त्यांना भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांची यात्रा केली आहे. त्याशिवाय सर्वितीया देवी परदेशवारी देखील करून आल्या आहेत. लक्ष्मी दास 16 व्या वयापासूनच भीक मागत आहेत. लक्ष्मी दासला पोलिओ आहे आणि भिक मगून मगून खूप मोठे बैंक बैलांस जमा केले आहे आणि आता काही दिवसापूर्वीच त्यांना ब्यांकेचे क्रेडीट कार्ड भेटले आहे.