अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 :पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे रिपोर्ट आज (दि.29) पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यांच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांचा बाहेर मोठ्याप्रमाणात वावर होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शहर दौ-यावर आले असताना लांडगे त्यांच्यासोबत होते.
कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयाला त्यांनी भेट दिली होती. लांडगे यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या घशातील द्रवाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
त्यात त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या हायरिस्क कॉन्टक्टमधील नागरिकांची आता तपासणी केली जाणार आहे.हिंदुस्थान समाचार
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews