पारनेरचे ‘ते’ नगरसेवक पुन्हा येणार शिवसेनेत ; झाले असे काही की…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  पारनेरमधील ५ नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर खूप राजकीय हालचालींना वेग आला. स्वतः उद्धव ठाकरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

आता या गेलेल्या शिवसेना नगरसेवकांची घरवापसी होणार आहे. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांच्या मुत्सद्देगिरीला यश आलं आहे.

राष्ट्रवादीत गेलेले नगरसेवक आता माघारी परतणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी अजित पवारांची भेट घेतली.

त्या भेटीत नगरसेवकांच्या घरवापसीचा निर्णय झाला. यावेळी पाचही नगरसेवक उपस्थित होते. हे नगरसेवक मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पारनेरमधील फोडाफोडीच्या राजकारणावर पडदा पडणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24