चोरटयांनी गाडीची काच फोडून पळविले 36 लाखांचे सोने

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नवीन पोलीस अधीक्षकांनी पदभार स्वीकारला आहे. आता या वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालणे हे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

दरम्यान राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील सराफ व्यावसायिकाच्या कारची काच फोडून सुमारे 36 लाखांचे सोन्या चांदी चोरीस गेल्याची घटना घडली आहे.

ही घटना गुरुवारी रात्री सात वाजेच्या सुमारास घडली. लोणी खुर्द गावात पिंपरी निर्मळ रस्त्यालगत संतोष कुलथे यांचे कुलथे ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान आहे.

कुलथे यांनी नेहमीप्रमाणे सात वाजेच्या दरम्यान दुकान बंद केले. दुकानातील सोन्या चांदीचे दागिने भरलेल्या तीन बॅगा कारमध्ये पुढच्या सीटवर ठेवल्या.

कार लॉक करून ते दुकान बंद करण्यासाठी गेले असता तीन मोटारसायकलवरून सहा दरोडे खोर कारजवळ आले. एकाने कराची काच फोडून बॅगा काढल्या.

काच तुटल्याचा आवाज आल्यावर कुलथे व त्यांच्या दुकानातील कामगार सुनील डहाळे यांनी आरडाओरडा केला. मात्र दरोडेखोरानी चाकूचा धाक दाखवत सोन्याच्या बॅगा घेऊन घटनास्थळावरून फरार झाले.

कुलथे यांनी तत्काळ पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलीस घटना स्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24