महाराष्ट्र

भरमसाठ ऊस, मोठ्याने लाउडपीकर लावून चालणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलीस करणार ‘ही’ कारवाई

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणी ऊस वाहतूक सुरु आहे. परंतु सध्या या उसवाहतुकीने अनेक समस्या निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त जास्त वाहतूक केली जात आहे.

त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यात आणखी एक समस्या प्रकर्षांने पुढे आली आहे. ती म्हणजे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवरील टेपरेकॉर्डर मोठ्या आवाजात लावले जातात. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतायेत,

रस्त्याकडील गावातील लोकांची झोपमोड देखील होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता मिरजगाव पोलीस याविरोधात ऍक्शनमोड वर आले आहेत.

* पोलीस करणार ‘ही’ कारवाई

मिरजगाव पोलिसांनी आता नियम मोडणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. मिरजगाव हद्दीतून जाणारी ऊस वाहतूक करणारे वाहने व त्या वाहनांवरील टेपरेकॉर्डर, अनावश्यक अडथळा निर्माण करणारी सजावट पोलिस काढून घेणार आहेत.

सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी म्हटलं आहे की, वाहतुकीसंदर्भात आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता ऊस वाहतूक चालकांनी करावी, जर वाहतुकीचे नियम मोडले तर चालकांविरोधात कडक कारवाई होईल. कारखाना चालकांनी देखील आपल्या कारखान्यावरील वाहनचालकांना याबाबर उदबोधन करावे असे त्यांनी म्हटले आहे.

*अपघात वाढले

ऊस वाहतूक करणारी जी वाहने आहेत त्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाययोजना नसतात. महामार्गावर उसाने भरलेल्या ट्रॉलीवर वाहने आदळून अपघात होतानाचा घटना वाढल्या आहेत. मोठ्या आवाजात संगीत या वाहनांवर वाजवले जात असल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा अंदाज त्यांना येत नाही. याने देखील आघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता ऍक्शन घेतली आहे.

ट्रॅक्टर चालकांची सर्कस

अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त ऊस घेऊन चालणाऱ्या ट्रॉली कसरत करत रस्त्याने चालताना दिसतात. चढाच्या ठिकाणी किंवा वळणावर ट्रॅक्टरचे पुढचे दोन चाके उचलली जाऊन मागील दोन चाकांवर नागमोडी वळण घेत हे लोक सर्कस करताना दिसतात. हे सगळे धोकादायक असून यावर देखील प्रशासनाने कारवाईत्मक पावले उचलावीत अशी मागणी केली जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office