अहमदनगरच्या ‘ह्या’ मुलाने बोर्डाच्या परीक्षेत केला अनोखा विक्रम !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- काल दहावीचे निकाल जाहीर झाले. कोणी 100 टक्के गुण मिळवले तर कोणी काठावर पास झाले. मात्र तेजस विठ्ठल वाघ (रा. हनुमानवादी, सोनई) या विद्यार्थ्याने सर्व विषयात ३५ मार्क मिळवून उत्तीर्ण झाला आहे.

शंभर पैकी शंभर पैकी गुण मिळवणे जेवढे अवघड त्यापेक्षा सर्व विषयात 35 गुण मिळवणे म्हणजे एक दिव्यच. पण हेच दिव्य अहमदनगर जिल्ह्यातील सोनई (ता. नेवासा) येथील एका पठ्याने साध्य केले आहे.

त्याने दहावी बोर्डाच्या परीक्षेत मराठी असो वा इंग्लिश किंवा गणित असो वा विज्ञान सर्व विषयात 35 गुण मिळवून परफेटक्ट 35 गुणांचा मान मिळवलाय.

तेजस हा शिंगणापूर येथील शनैश्वर विद्या मंदिर येथे दहावीमध्ये शिक्षण घेत होता. त्याला कसल्याही प्रकारे खाजगी शिकवणी नव्हती.या सोबतच त्याने सर्व विषयात ३५ टक्के गुण मिळवले आहे.तेजस या यशाचे कौतुक केले आहे.

त्याच्या परफेटक्ट 35 ची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. तेजसचे प्राचार्य डी. आर. सोनवणे, माजी प्राचार्य शशिकांत लिपाने यांनी अभिनंदन केले.

दरम्यान तेजसचा हनुमानवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याच्या अनेक मित्रांनी त्याच्यासह गुणपत्राचा फोटो व्हाट्सएप, स्टेटस, फेसबुक वर पब्लिश करत कौतुक केले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24