‘या’ मुलीला काल शिक्का मिळाला अन् तिच्या हाताची झाली ‘अशी’ दुरवस्था

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबईः सध्या कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे देशात लॉक डाऊन जाहीर केले. परंतु यामध्ये अनेक नागरिक विविध ठिकाणी अडकून पडले आहेत.

मुंबईत अनेक चाकरमानी गल्लीबोळात छोट्याशा खोलीत राहत असल्यानं कोरोना संसर्गाची भीती आहे. त्यामुळे बरेच जण गावाला जायच्या मार्गावर आहे.

पण गावी जाण्यासाठीही अनेकांना ई-पास घ्यावा लागतोय. त्यानंतर आरोग्य तपासणीकरून त्यांच्या हातावर शिक्का मारला जातो. परंतु या शिक्क्याने मुलीच्या हातची दुरवस्था झाल्याचा आरोप  भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

एक दोन बहिणींसह कुटुंब मुंबईहून देवगडला गेलं. काल त्यांची गाडी सकाळी 12.30 वाजता खारेपाटण इथे पोहोचली, तब्बल 9 तासांनी त्यांचा नंबर लागला.

तिथे त्यांची आरोग्य तपासणी झाल्यानंतर त्यांच्या हातावर शिक्के मारण्यात आले, आज सकाळी त्यांच्या हाताची ही अवस्था बिकट झाली होती,

तसेच त्यांच्या हातावर फोड आले असून, हात काळा पडला आहे. त्यावरूनच भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे

अहमदनगर लाईव्ह 24