अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यात सत्तेसाठी तीन, तर जिल्हा परिषदेत चार पक्ष एकत्र आले. राज्य सरकार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक करत असून आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला याचा जाब विचारू. एक वर्षाचा कार्यकाळसुद्धा हे सरकार पूर्ण करू शकणार नाही, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली.
हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले….
पाथर्डी नगरपालिकेत गुरुवारी रात्री विखेंच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. अध्यक्षस्थानी भाजप तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर होते. विखे म्हणाले, विखे पॅटर्न संपवण्यासाठी अनेक जण एकत्र आले असले, तरी विखे पॅटर्न सर्वांना पुरून उरणार आहे. भाजपचे सरकार येईल, अशी अपेक्षा होती. त्यादृष्टीने विकासकामांचे नियोजन झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली कामे करत जिल्ह्यात भाजप सर्वत्र रुजवायचा आहे.
हे पण वाचा :- पत्रिका नसली, तरी लग्नाला जा…हरिभाऊ बागडे यांचा अहमदनगरच्या भाजप कार्यकर्त्यांना सल्ला !
विखे गट, राजळे गट, मूळ भाजपचा गट सर्वांनी एकत्र राहिल्यास कोठेही अडचण येणार नाही. आमदार मोनिका राजळे यांनी पाथर्डी, शेवगाव पालिकांसाठी भरीव निधी आणला. लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले. जिल्ह्यात आम्ही व राजळे दोघेच निवडून आल्याने अधिक जबाबदारीने पक्षाचे काम करावे लागेल.
हे पण वाचा :- माजी आमदार शिवाजी कर्डिले नाही होणार भाजपचे जिल्हाध्यक्ष !
भाजप व विखे संपले पाहिजेत, असे स्वप्न अनेक जण पहात आहेत. ज्या दिवशी असे घडेल त्या दिवशी गरिबाला कुणी वाली उरणार नाही. सत्ता आमच्यासाठी महत्त्वाची नाही. पदे म्हणजे उत्पन्नाचे साधन नाही. एकाही सरपंचाने विखेंनी एक टक्का, तरी आतापर्यंत मागितला का, हे सांगावे.
हे पण वाचा :- अल्पवयीन मुलीवर घरात बलात्कार ! नातेवाईकांनी दिली मुलीलाच जिवे ठार मारण्याची धमकी …
आम्ही सत्तेत येण्यापूर्वी जिल्हा परिषदेत काय चालू होते हे मी सांगण्याची गरज नाही. घरकुलांसाठी निधी लवकर मिळावा यासाठी प्रयत्न करू. त्या समितीचा मी सदस्य आहे, असे विखे म्हणाले. प्रास्ताविक नगराध्यक्ष डॉ. गर्जे यांनी केले. सूत्रसंचालन अय्युब सय्यद यांनी केले, तर आभार नगरसेवक रमेश मोरे यांनी मानले.
हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : आमदार निलेश लंकेंच्या गावात तरुणाचा खून
नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, अभय आव्हाड, अजय रक्ताटे, प्रतीक खेडकर, गटनेते नंदकुमार शेळके, रामनाथ बंग, संतोष गट्टाणी, भाजप शहराध्यक्ष अजय भंडारी, गोकूळ दौंड, रवींद्र वायकर, सुभाष घोरपडे आदींसह नगरसेवक व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.