हे सरकार पुढची पाच वर्षे पूर्ण करणार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई : विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठीची संपूर्ण रणनीती भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आखण्यात आली आहे. विश्वासदर्शक प्रस्ताव आम्हीच जिंकणार असून हे सरकार पुढची पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास भाजपा नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात व्हीप हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच चालणार असल्याचे विधानही त्यांनी केले. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची, तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांचा शपथविधी झाल्याबद्दल भाजपाच्या बैठकीत अभिनंदनाचा ठरावही संमत करण्यात आला.

भाजपाच्या ‘वसंतस्मृती’ या कार्यालयात भाजपाच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे जवळपास सर्व आमदार या वेळी उपस्थित होते.
या बैठकीनंतर आशिष शेलार यांनी पत्रकारांना माहिती दिली.

विश्वासदर्शक ठराव संमत कसा करायचा, याची संपूर्ण रणनीती आखण्यात आली आहे. आम्हीच विश्वासदर्शक ठराव जिंकणार असून हे सरकार पुढची पाच वर्षे पूर्ण करणार

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24